भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी

kan re namya nayakashi | mhanoni tadit tayasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी ॥१॥ नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥ अन्न उदकाविण पीडिती । परी तो विठू ध्याय चित्तीं ॥३॥ मनीं करीतसे खेद । एका जनार्दनीं गोविंद ॥४॥