भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया

kan re nathavisi divasache chori | prapanch bhonvarin padasi raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥ वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय दुःख रया ॥२॥ सुख दुःखें दोन्ही भातुकी असती । प्रपंचाचे अंतीं भोगिसी रया ॥३॥ रामनाम वाचे वाचे सदा गात जाय । न धरीं तूं हाय वाउगी रया ॥४॥ एका जनार्दनीं किती सांगुं मूढा । वायां तूं दगडा भूमीभार ॥५॥