भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला

kala te kusari navhe hen shabdik | anurenu ek bharuni urala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥ तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥ एका जनार्दनीं शब्दवेगळा असे । तो उभा दिसें कीर्तनरंगीं ॥३॥