भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे

kalikal bapuden namapudhen dade | aise thor povade shriramache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥ ऐसे वर्म सोपें सांडोनी शिणती । वायां हीन होती हांव भरी ॥२॥ असोनियां देहीं फिरती ते वायां । वाउगाचि तया शीण होय ॥३॥ एका जनार्दनीं आत्माराम देहीं । आसोनी न कळे कांहीं शिणती वायां ॥४॥