भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कायावाचामनें निग्रह करीं । कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं । अष्टांग साधन न करी । सुखें करी कीर्तन ॥१॥ देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥

रचनाकार: संत एकनाथ

कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥ काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥ अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥ आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती यमदंड ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥ वाचे सदा श्रीराम । तेणें पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥ अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख । अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥ अरे आलेती संसारा । कांहीं ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळें ना सांवळें गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥ आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥ कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥ तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥ दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ