भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें

kayavachamanen | krupalu dinakaranen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥ ऐसा समर्थ तो कोन । माझ्या जनार्दनावांचुन ॥२॥ माझें मज दाखविलें । उघडें वाचे बोलविलें ॥३॥ जनीं जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥