भजनी मालिका
← भजनांकडे परत

कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य

karya karta ani karan | triguneshin triputi shunya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥ अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥ ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥३॥