भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतीस खेपा जन्माकोटी ॥१॥ कीर्तनीं समाधीं कीर्तनीं समाधी । पुढें आधीव्याधी कीर्तनेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥ ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधिव्याधी ॥१॥ कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एक ठाया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥ भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥ कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥ तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥ न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी । एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्ण सर्वागीं सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्यभामा म्हणे हा वर । जन्मोजन्मीं पावावा ॥१॥ ऎसें विचारितां मनीं । तंव पातले नारदमुनी । चरणां लागली धांवोनी । वरासनीं बैसविलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ