भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिलें पातकी अपार

kirti tumachi tihin lokin | tarilen pataki apar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिलें पातकी अपार ॥१॥ जाहला विश्वास आधीं मना । धरिलें चरणां दृढ मग ॥२॥ एका जनार्दनीं लडिवाळ । करा सांभाळ आतां माझा ॥३॥