भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी

krupalu mauli anatha sauli | ubha ti rahili vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥ भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥ मोक्षमुक्ति फुका वांटितो दरुशनें । नाहीं थोर सानें तयासी तेथें ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । कैवल्याच गाभा पाडुरंग ॥४॥