भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं

krutantache mathan deuniyan pay | vache nam gay aharnishin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं न करी आळस । चौर्‍यांशीचा लेश नको भोगुं ॥३॥