भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनें तोषे अधोक्षज । राखी लाज भक्तांचीं

kirtanen toshe adhokshaj | rakhi laj bhaktanchin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनें तोषे अधोक्षज । राखी लाज भक्तांचीं ॥१॥ धावें द्रौपदीचें पानासाठीं । भीड मोठी कीर्तनाची ॥२॥ दहा गर्भवास सोसले । उणें नाहीं आलें भक्तांचें ॥३॥ एका विनवी जनार्दनीं । कीर्तनीं प्राणी धन्य होती ॥४॥