भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी

krupasindhu te sant | tariti patit anyayi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥ न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥ तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणें ॥३॥ एका जनार्दनीं धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥