भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी

krupalupanen ubha vitevari | pahe avalokoni drushtibhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥ न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥ युगें जाहलीं नोहे लेखा । एका जनार्दनीं भुलला देखा ॥३॥