भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायावाचामनें छंद । धरा गोविंद ह्रुदयीं

kayavachamanen chhand | dhara govind hrudayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कायावाचामनें छंद । धरा गोविंद ह्रुदयीं ॥१॥ नका जाऊं लिगाडामागें । ऐसें सांगे वेदशास्त्र ॥२॥ पुराण पठण यज्ञयाग । नोहे भाग कलीमाजीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । उतरील पार भवसागरीं ॥४॥