भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥ खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं ॥१॥ मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजें नेघे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥ हेचि एकविधा भक्ति । येणें जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथें घेती सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें ॥१॥ आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥ नाम हे नौका नाम हे नौका । जगीं तारक देखा भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा ॥१॥ दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकपणेंदेव विटेवरी उभा ।चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ मानस मोहन भक्तांचे जीवन । योगियांचे ध्यान पाडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ