भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकचि नाम वाचे । श्रीरामाचें सर्वकाळ

ekachi nam vache | shriramachen sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकचि नाम वाचे । श्रीरामाचें सर्वकाळ ॥१॥ पर्वत उल्लंघी पापाचे । नाम वाचे वदतांची ॥२॥ आवडी करितां कीर्तन । नासे भवाचें बंधन ॥३॥ श्रेष्ठ साधन कीर्तन । तेणें तोषें जनार्दन ॥४॥ एका जनार्दन कीर्तन । मना होय समाधान ॥५॥