भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख

ek vel vache ved kan re nam | nirase sarva shram bhavaduhkh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥ नाम हे नौका नाम हे नौका । जगीं तारक देखा भाविकांसी ॥२॥ एका जनार्दनीं नाम हें अमृत । सेवितां त्वरित मुक्ति होय ॥३॥