भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकपणेंदेव विटेवरी उभा ।चैतन्याचा गाभा पाडुरंग

ekapanendev vitevari ubha |chaitanyacha gabha padurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकपणेंदेव विटेवरी उभा ।चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ मानस मोहन भक्तांचे जीवन । योगियांचे ध्यान पाडुरंग ॥२॥ अनाथा कोंवसा ध्यानीं नारायणा । सुखाची सांठवण पाडुरंग ॥३॥ एका जनार्दनीं आनंदाचा कंद । पाहतां आनंद पाडुरंग ॥४॥