भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण

ek mhanati atma sagun | ek mhanatati nirgun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण ॥१॥ एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥ एक म्हणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथें ॥३॥ ऐसें नानाभेद वाद सकळ । विचारितां अज्ञान मूळ ॥४॥ अज्ञान तें मिथ्या जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥