भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती

ek viththal vadatan vache | anik sachen navadati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती ॥१॥ बैसलासे ध्यानीं मनीं । विठ्ठलावांचुनीं दुजें नेणें ॥२॥ जावें तिकडे विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥३॥ एका जनार्दनीं भावें । विठ्ठल म्हणतां पाठी धांवें ॥४॥