भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु

ek panch sat miloni khelati vitidandu | dav aliya paluni jatan taya mhanati gandu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥ खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥ मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥ आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥