भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे

ekapanen ek pahatan jag disen | yogiyansi pinse sada jyanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥ व्यापक विश्वभंर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळीं ॥३॥ एका जनार्दनी त्रिगुणांवेगळा । पहा पहा डोळां विठ्ठल देव ॥४॥