भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥ ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें ॥१॥ ऐसें असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुद्ध ब्रह्माज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा । देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥ शुद्धब्रह्माज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्माडाचें दुर्ग ब्रह्मांडाचें दुर्ग । विरोनी अर्व आत्मा मी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥ देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२

रचनाकार: संत एकनाथ

शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥ भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥ वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥ जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥ तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी ॥१॥ तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड लीळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥ आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं कोवळीं तीं ॥१॥ ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥ ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण ॥ महादेव ॥१॥ इंद्रियां अतीत आपण । देखिजें हें ज्ञान कारण ॥ महादेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥ डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें ॥१॥ आतां पहावें तें काये । जे पाहें तें आपणचि आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ