भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा

shudradik varna tyache pay dhuti | upadesh gheti tayache ga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥ वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥ आचार सांडोनी होती शब्दज्ञानी । व्यर्थ अभिमानी पडताती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसिया पामरा । केवीं विश्वंभरा पावसील ॥४॥