भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं

shyam chaturbhuj pitambaradhari | shankh chakra mirave karin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥ आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥ युगे अठ्ठावीस जाली । न बैसे उभा सम पाउली ॥३॥ कीर्तनीं धरुनियां हेत । उभा राहिला तिष्ठत ॥४॥ एका शरण जनार्दनीं । अनुदिती करा किर्तन ॥५॥