भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन

shuddha jyachen man | taya avade kirtan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥ येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥ नावडे हरीचें कीर्तन । तेथें वसे नाना विघ्र ॥३॥ एका शरण जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥४॥