भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं

shravanin aiken tumachen gunanam | vache anik kam na karin na kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥ डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥ अष्टभावें कंठीं दाटेन सगद्रद । सांडोनी भेदाभेद आन देवा ॥३॥ एका जनार्दनीं यापरतें प्रेम । आन नाहीं विषम मजपाशी ॥४॥