भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें

shravanin aikoni pahavaya yenen | tanv dolechi jale dekhanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें ॥१॥ आतां पहावें तें काये । जे पाहें तें आपणचि आहे ॥२॥ जें जें देखों जाये दिठी । तें देखणें होउनी नुठी ॥३॥ एका जनार्दनीं पाहे लीला । पाहतां पाहणें अवलीळा ॥४॥