भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती

shobhati doni katin kar | rup sanvalen sundar | kesharachi uti nagar | galan mal vaijayanti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥ उभारुनी दोन्हीं बाह्मा । भाविकांची वाट पाहे । शाहाणे न लभती पाय । तया स्थळी जाऊनी ॥३॥ ऐसा उदार मोक्षदानी । गोपी वेधक चक्रपाणी । शरण एका जनार्दनीं । नाठवे दुजे सर्वदा ॥४॥