भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं

shukadik yogi rangale shrirangin | nam pavitra jagin japa adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥ परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥ एका जनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चारितां जाण श्रम हरे ॥४॥