भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥ प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाहीं आणिक तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं ॥१॥ वायां तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वर्णावी ती थोरी एका सदगुरुची । येरा मानवाची कामा नये ॥१॥ सदगुरु समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां ॥१॥ सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वर्म जाणें तो विरळा । तयांचीं लक्षणें पैं सोळा । देहीं देव पाहे डोळां । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥ जन निंदो अथवा वंदो । जया नाहीं भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगीं न बाणती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वसो कां भलते ठायीं जन । परि कीर्तन करी हरीचें ॥१॥ तोचि सर्वांमध्यें वरिष्ठ । एकनिष्ठपणें होतां कीर्तनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वहिनीनें आम्हां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥ म्हणे माझें वस्त्र ग्रंथीं कोठें आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगा पसारा नेणें तो पामर । कीर्तनीं निर्धार ठेवीचिना ॥१॥ सोपें हें वर्म कीर्तन हरीचें । उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण ॥१॥ किती करिसी सोस माझें माझें म्हणोनि । शेवटीं बंधनीं पडसी मूढा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावें ॥१॥ जाणोनि नेणतां कां होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगाची सोस वाहताती वोझें । म्हणती माझें माझें हीन भाग्य ॥१॥ जाणती नेणती राहाटी देखती । मरती रडती देखती त्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥ अंतकाळीं सखा कोणी नाहीं दुजा । पुत्र पत्‍नी वोजा न ये कामा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगीं नाहीं ॥१॥ संसारीं असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्माज्ञानीं विरक्त तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ