भजनी मालिका
← भजनांकडे परत

वहिनीनें आम्हां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी

vahininen amhan kay dhadiyelen | mag athavalen sudamyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वहिनीनें आम्हां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥ म्हणे माझें वस्त्र ग्रंथीं कोठें आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥ बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वतां बोलतसे ॥३॥ सोडोनियां ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवें ॥४॥ एक ग्रास मुखीं घालितांचि जाण । एका जनार्दनीं खूण समजली ॥५॥