भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगीं नाहीं

vauge te bol bolati chavati | brahmadnyan kasavati angin nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगीं नाहीं ॥१॥ संसारीं असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्माज्ञानीं विरक्त तो ॥२॥ आकाशमंडळीं रवि तो भ्रमला । परिरांजणीं बिंबला नाथिलाची ॥३॥ एका जनार्दनीं प्रसादावांचुनीं । ब्रह्माज्ञान मनीं न ठसे कधीं ॥४॥