भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके

vauge te bol bolati abala | kavan te gopala dharun shake

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥ एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥