भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरीवरी दावी भक्ति । अंतरीं असे कामासक्ति

varivari davi bhakti | antarin ase kamasakti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वरीवरी दावी भक्ति । अंतरीं असे कामासक्ति ॥१॥ माझें घर माझें कलत्र । माझें गोत्र माझा पुत्र ॥२॥ ऐसा प्रपंची गुंतला । तयावरी काळघाला ॥३॥ एका जनार्दनीं शरण । काळ वंदितसें चरण ॥४॥