भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगाची पसारा । कां रे वाढविला गव्हारा

vaugachi pasara | kan re vadhavila gavhara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगाची पसारा । कां रे वाढविला गव्हारा ॥१॥ म्हणसी माझें माझें । अंती कोण आहे तुझें ॥२॥ भुललासी वायां । गमाविसी व्यर्थ काया ॥३॥ कोण हें कोणाचें । एका जनार्दनीं साचें ॥४॥