भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या

vaugi upadhi na kari re mana | chinti ya charana raghavachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥ अंतकाळीं सखा कोणी नाहीं दुजा । पुत्र पत्‍नी वोजा न ये कामा ॥२॥ चालतांचि देह म्हणती माझा माझा । अंतकाळ पैजा यम बांधी ॥३॥ एका जनार्दनीं सर्व हें मायिक । शाश्वत तें एकक श्रीरामनाम ॥४॥