भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसो कां भलते ठायीं जन । परि कीर्तन करी हरीचें

vaso kan bhalate thayin jan | pari kirtan kari harichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वसो कां भलते ठायीं जन । परि कीर्तन करी हरीचें ॥१॥ तोचि सर्वांमध्यें वरिष्ठ । एकनिष्ठपणें होतां कीर्तनीं ॥२॥ मनीं वसो सदा कीर्तन । अहर्निशीं ध्यान कीर्तनीं ॥३॥ पावन तो तिहीं लोकीं । एका अवलोकीं तयातें ॥४॥