भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥ तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटीं पावलें दोन्हीं साजिरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥ कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥ जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥ देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाहीं । वाटाघाटी तयांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥ अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥ चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥ वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥ सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रें होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥ शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥ तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ