भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥ गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥ धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥ दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥ मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येरा तें करितां वायां जाय ॥१॥ पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जगीं शीण तैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥ सोळा सहस्त्र शत अष्ट त्या नाइका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥ विठ्ठलशेटी नाहीं परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥ ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेथें नाहीं सुखदुःखवार्ता ॥१॥ नामीं धरुनी आवडी । उच्चारावें घडोघडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥ मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ