भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा

prapanchacha bhav vahatase khar | na kale vichar sadhanancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥ गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥ टाळी लावूनियां बैसलासे बक । तैसाचि तो देख नामहीन ॥३॥ आवडीं आदरें न ये नाम मुखीं । एका जनार्दनीं सुखी केवीं होय ॥४॥