प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं
premal premal antarin premal | nahin kal vel tayalagin
प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
premal premal antarin premal | nahin kal vel tayalagin
प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥
premalansi vishrantisthan | maha mukti kar jodoni | ruddhi siddhi volangan | tishthati jan pandhariye
प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोनी । ऋद्धि सिद्धि वोळंगण । तिष्ठती जाण पंढरीये ॥१॥ धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव । दरुशनेम निरसे भेव । यम काळ दुतांचें ॥२॥
premen puji mesabai | sandoniyan vithabai
प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥ काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥
premen bhaktanchi avadi | mhanoniyan dhuto ghodi
प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी ॥१॥ ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥
phajitakhoranche jivin | laj nahin sarvatha
फजितखोरांचे जीवीं । लाज नाहीं सर्वथा ॥१॥ सांगता ते न धरती मनीं । नायकती कानीं शिकविलें ॥२॥
phajitiche dev magati ghutiroti | apanasathin jaga pidito kalatonden mothin
फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥ नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥
phat gadhavachya leka | sansar kela phuka ||dhru
फट गाढवाच्या लेका । संसार केला फूका ॥ध्रु०॥ खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ॥१॥
phanas khatan lage god | tethen adhik khay tond
फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥ सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे बेलपत्रीं चढे ॥२॥
phanas jambir kardali data | hatin gheuni nanragi phata
फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥
phar bolun kay vanya | janavel paya chitta majhen
फार बोलूं काय वांया । जाणवेल पाया चित्त माझें ॥१॥ धन्य धन्य तुम्ही संत । कॄपावंत संसारीं ॥२॥
phiralon min dashadisha | vayan sosa hav bhari
फिरलों मीं दशादिशा । वायां सोसा हाव भरी ॥१॥ नाहीं जाहलें समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं ॥२॥
phugadi ghali mipanachi | veni gumphi trigunachi
फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥ चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥
phutaliya ghat | nase jivan pragat
फुटलिया घट । नसे जीवन प्रगट ॥१॥ घटमाजीं जीवन । घट फूटतां नसे जाण ॥२॥
phule jhade tanv phal sose | taya pathin tenhin nase
फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठीं तेंहीं नासे ॥१॥ एक मागें एक पुढें । मरण विसरलें बापुडें ॥२॥
bakachiye pari dhyan nako dharun | jivebhaven dharun santacharan
बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण ॥१॥ मग ते तात्काळ करिती पावन । ऐसें अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥
bandhanacha phansa baisalase galin minapari gili sarvakal
बंधनाचा फांसा बैसलासे गळीं मीनापरि गिळी सर्वकाळ ॥१॥ आमीष विषया भुलला पामर । भोगिती अघोर चौर्यायंशी ॥२॥
badhir jale pain shravan | jale dant unmalan
बधिर जाले पैं श्रवण । जाले दंत उन्मळण ॥१॥ अझुनी काय धरिसी माया । गेलीं इंद्रियें विलया ॥२॥
baravi ti puja | jenen pave adhokshaja
बरवी ती पूजा । जेणें पावे अधोक्षजा ॥१॥ मुखीं नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥
baravi shriharichi murti | devhara pujili hoti | bare ha lakshmicha pati | dudh mage tayasi
बरवी श्रीहरीची मूर्ती । देव्हारा पूजिली होती । बारे हा लक्ष्मीचा पती । दुध मागे तयासी ॥१॥ ऐशीं तिघें उपवास करिती । मातापितरें चिंतेत पडती । जन मिळाले बहुती । तयासी उठवूं आदरिलें ॥२॥
baren va vait nam koni ghoka | to hoy sakha vithobacha
बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥ कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥