भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा

baren va vait nam koni ghoka | to hoy sakha vithobacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥ कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥ विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ॥३॥ एक जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ॥४॥