भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥ गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥ प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥ संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥ सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणीं । जेवी शारंगपाणी आनंदानें ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव नारदमुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥ धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोधभानु तया नाहीं माध्यान्ह सायंप्रातर नाहीं तेथें कैंचा अस्तमान ॥१॥ कर्माचि खुंटलें करणेंचि हारपलें । अस्तमान गेलें अस्तमाना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥ बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥ दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ