भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोल बोलता वाचें । नाम आठवींविठ्ठलाचें

bol bolata vachen | nam athavinviththalachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बोल बोलता वाचें । नाम आठवींविठ्ठलाचें ॥१॥ व्यर्थ बोलणें चावटी । नामावांचुनी नको होटी ॥२॥ नाम हें परमामृत । नामें पावन तिन्हें लोक ॥३॥ नाम सोपें भूमंडळीं । महापापां होय होळी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । नाम पतीतपावन ॥५॥