भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान

prapanchachen bhan | ahe mrugajalasaman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥ नाथिलेंचि सत्य दिसे । सत्य आहे तें आभासे ॥२॥ मृगजळीम उप्तत्ति नाहीं । पाहतां अवघे मिथ्या पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मिथ्या अवघे देह जाण ॥४॥