भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळी पृष्ठी जें शोभलें । तें विटेवरी देखिलें

bali prushthi jen shobhalen | ten vitevari dekhilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बळी पृष्ठी जें शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ पुंडलीके जें ध्याइलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ सनकादिकीं जें पाहिलें । तेंविटेवरे देखिलें ॥३॥ एका जनार्दनीं वंदिलें । तें विटेवरी देखिलें ॥४॥