भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची

bahu marga bahutapari | pari na pavati sari pandharichi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥ ज्या ज्या मार्गे जातां वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥ जेथें नाहीं कार्माकार्मा । सोपें वर्म पंढरीये ॥३॥ न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥ म्हणोनि पंढरीसी जावें । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥