भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु पुण्य होय गांठीं । तरीच भेटी संतांची

bahu punya hoy ganthin | tarich bheti santanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु पुण्य होय गांठीं । तरीच भेटी संतांची ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥ मोक्ष मुक्ति साधे फुका । ऐशी देखा संतकृपा ॥३॥ नाहीं आणिकांचें भेव । संत सदैव भेटतां ॥४॥ एका जनार्दनीं संत । पुरविती हेत सर्वही ॥५॥